ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“क्युबा” च्या शिष्टमंडळाची ” शाहू” साखर कारखान्यास भेट ; ” शाहू ” च्या नवीन उपक्रमांचे आणि अद्यावत तंत्रज्ञान वापराचे केले कौतुक

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

“क्युबा” सरकारच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्प ,विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संचालिका श्रीमती अॅडिलेडिस रायझ बारसेनास व राष्ट्रीय रेशीम प्रकल्प,वनस्पती संरक्षण आणि जैव-नैसर्गिक उत्पादन संशोधन केंद्र, हवाना( क्युबा)चे संशोधक श्री कार्लोस डेव्हिड क्रुझ मेसा यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच साखर कारखानदारीत देशात आदर्श असलेल्या येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास भेट दिली व “शाहू ” च्या नवीन उपक्रमांचे आणि अद्यावत तंत्रज्ञान वापराचे कौतुक केले .

भविष्यातील साखर उद्योगाच्या फायद्यासाठी सुधारित ऊस जाती,ऊस विकास योजना ,ऊस उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान,आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान,साखर पुन:प्राप्ती या विषयाची सविस्तर माहिती घेणेच्या दृष्टीने ही भेट होती.

शाहू व्यवस्थापनाने व प्रशासनाने कारखाना चालवीत असताना नेहमीच आधुनिकतेचा स्वीकार करीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.यामध्ये शाहू प्रशासन यशस्वी झाले आहे. म्हणूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे कुलगुरु डॉ पी जी पाटील यांच्या शिफारशीने या विषयाची माहिती घेण्यासाठी शाहु कारखान्याची निवड करण्यात आली होती. राहुरी विद्यापीठाच्या वतीने या शिष्टमंडळाचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजना चे प्रमुख अन्वेषक व नोडल ऑफिसर डॉ. डी एच फाळके उपस्थित होते.

कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीतून सुरू केलेल्या व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कुशल नेतृत्वाखाली यशस्वीपणे घोडदौड करीत
असलेल्या शाहू साखर कारखान्याच्या शेतकरी हिताच्या योजनांचे,अद्यावत तंत्रज्ञानाचे व नवीन उपक्रमांची कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी शिष्टमंडळास सविस्तर माहिती दिली.

या शिष्टमंडळाने कागलमधील शेतक-यांचे व कारखान्याच्या प्रक्षेत्रातील ऊस जातींची व शाहूच्या सुसज्ज माती परिक्षण शाळेची माहिती घेतली.

या अभ्यास दौ-यात शिवाजी विद्यापीठाच्या रेशीम उष्मायन केंद्र व प्राणीशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव हे सहभागी झाले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी के.बी.पाटील उपस्थित होते.

यानिमित्ताने परदेशी पाहुण्यांचा कार्यकारी संचालक यांच्या हस्ते राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा पुतळा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks