ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : पर्यावरण प्रेमी डॉ. दीपक शेटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

कोल्हापूर प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती यांच्याकडून डॉ . दीपक मधुकर शेटे यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .याबाबतची पत्र महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तानाजी शिंदे व उपाध्यक्ष रंजन खरोटे यांनी दिले.
डॉक्टर दिपक शेटे हे स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज मिणचे या निवासी शाळेत गेली 22 वर्षे गणित व विज्ञान हे विषय शिकवतात .
डॉ दिपक शेटे सातत्याने पर्यावरण पूर्वक सण साजरे करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात . त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी विशेष उपक्रम हाती घेतली आहेत . स्टार अकॅडमी च्या मार्फत शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे .त्यांच्या या उपक्रमाबद्दल प्रबोधन समितीच्या वतीने गौरवपत्र देण्यात आले व त्यांची निवड करण्यात आली . त्यांच्या निवडीबद्दल पर्यावरण प्रेमीच्या कडून कौतुक होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks