ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड (ता.कागल) येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला .
शाळेच्या प्राचार्या सौ .जसमीन जमादार यांनी ध्वजारोहण केले .तत्पूर्वी ,विदयार्थी तथा शिक्षक,पालक,चालक प्रतिनिधी यांनी ध्वजाचे पूजन केले.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक व भारतीय जवान यांच्या गौरवार्थ देश राष्ट्रभक्तीपर गीते व भाषणे सादर करण्यात आली .
‘तेरी मिट्टी ‘व वंदेमातारम या गीतांनी व प्राचार्य जसमीन जमादार यांच्या प्रेरणादायक भाषणाने कार्यक्रमाची उंची वाढली .अध्यक्षस्थानी व्ही.आर .भोसले हे होते .काही पालकांचा उपस्थितिने कार्यक्रमास शोभा आली.