ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर झाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात होते. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन देण्यात आला आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असताना नवाब मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि आज अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना दोन महिन्यांकरीता जामीन मंजूर झाला आहे.