ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सावरवाडी येथे रक्तदान शिबीरा पन्नास युवकांचा सहभाग

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील माजी सैनिक कै शिवाजीराव जाधव यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्य शिवतेज तरुण मंडळ व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबीरात एकूण ५० युवकांनी सहभाग नोंदविला .
शिबीराचे उद्घघाटन करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व कॉग्रेस नेते राजेंद्र सुर्यवंशी यांच्या हस्ते झाले . यावेळी सावरवाडी , बीडशेड , गणेशवाडी, आदि गावातील युवकांनी रक्तदान शिबीरात भाग घेतला .विकी जाधव यांनी प्रास्ताविक व शेवटी रोहित जाधव यांनी आभार मानले सोशल डिस्टन्स ठेवुन रक्तदान शिबीर पार पडले