ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा.डॉ. आर.डी. कांबळे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

कोवाड :

येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.आर.डी.कांबळे यांना ज्ञानज्योती बहुद्द्देशीय संस्था टाकळीभान श्रीरामपूर जि. अहमदनगर येथील राज्यस्तरीय उत्कृष्ठ मराठी अद्यापन कार्यगौरव पुरस्कार मराठी राजभाषादिनी घेण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी ग्रामीण संमेलनात नुकताच प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. आर .डी. कांबळे यांचे मूळ गाव कोरज असून सद्या ते नेसरी येथे वास्तव्य करत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले असून महाविद्यालयीन चंदगड, गडहिंग्लज, हलकर्णी येथे झाले.तर पदवी नंतरचे शिक्षण शिवाजी विद्यापीठात पूर्ण केले. त्यानंतर ते कोवाड येथे पद्मश्री स्वामीकार रणजित देसाई यांच्या भूमीत मराठी भाषेचे अद्यापन् कार्य करत असून सद्या ते मराठीचे विभाग प्रमुख या पदावर कार्यरत आहेत.

त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची एम.फिल पदवी .”गो.वि.करंदीकर यांच्या स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ” या लघुनिबंधाच्या अनुषंगाने या विषयावर प्राप्त केली.तर शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी .”दलित कादंबरीची समाजभाषावैज्ञानिक चिकित्सा”या विषयावर् प्राप्त केली, तसेंच यु जी.सी दिल्ली अनुदानातून “मराठी नाटकातील स्त्री जाणीवा” हा लघुप्रकल्प सादर केला.

डॉ. कांबळे मराठी भाषेची निरंतर सेवा प्रचार आणि संशोधन कार्य करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक शाळा.महाविद्यालय या ठिकाणी, सांस्कृतिक शैक्षणिक, सामाजिक भाषा,बोली,संस्कृती, आदी विषयावर् मार्गदर्शनपर , प्रबोधनपर व्याख्याने केली आहेत ,

विद्यापीठ,महाविद्यालयाने आयोजित केलेल्या परिषदा,कार्यशाळा, संमेलन,चर्चासत्रातून समाज, भाषा,संस्कृती,बोली,दलित साहित्य,ग्रामीण ,आदिवासी,स्त्रीवादी,साहित्य,लोकसंस्कृती,लोकसाहित्य,समाजभाषावैज्ञानिक आदी विषयी शोधनिबंध, सादर केले आहेत. अनेक विद्वत् शोध पत्रिकेत त्यांचे शोध निबंध प्रकाशित झालेले आहेत.ते सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत असून शिवाजी विद्यापीठाचे पीएच.डी.च्या मराठी विद्यार्थाना मार्गदर्शक म्हणून ते काम करत आहे.

त्यांच्या या कार्याबदल संस्था अध्यक्ष. डॉ. ए.एस.जांभळे संस्था सचिव मा.एम.व्ही.पाटील यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.एम् एस.पवार यांनी स्टाफच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

प्रा. डॉ.आर. डी. कांबळे यांना शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार 2016, समता राष्ट्रीय सम्मान पुरस्कार.2017, उत्कृष्ठ सहायक प्राद्यापक राष्ट्रीय पुरस्कार 2017 अशा शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks