मुरगूडमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडे यांचा मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी निषेध करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले. दलितमित्र प्रा. डी. डी. चौगले निषेध करताना म्हणाले, मनुवादी प्रवत्तीच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हस्तक असणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
समाजवादी प्रबोधिनी व इतर संघटनांच्या वतीने हुतात्मा तुकाराम चौकात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिमा दहन करण्यात आली. एम. टी. सामंत, बी. एस. खामकर, जयवंत हावळ यांनी भिडेंचा निषेध करणाऱ्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, विलास भारमल, पी. व्ही. पाटील, शाहू फर्नांडिस, महादेव वाघवेकर, प्रदीप वर्णे, सचिन सुतार, सिकंदर जमादार, सुनील कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.