ताज्या बातम्यानिधन वार्ता

प्रसिद्ध मृदंगाचार्य हभप नामदेव कुंभार यांचे निधन

                   

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील कसबा बीड   येथील वारकरी संप्रदायातील गायक , व  प्रसिद्ध मृदंगाचार्य हभप नामदेव शंकर कुंभार ( वय ७५ ) यांचे निधन झाले.

कुंभार महाराज यांनी गेली पाच दशके वारकरी संप्रदायामध्ये योगदान दिले . अनेक गावात त्यांनी विठ्ठलपंथी भजनाचे शिक्षण अनेकांना दिले . वास्कर फडावरील ते निष्टांवंत वारकरी होते . त्यांच्या निधनामुळे ग्रामस्थ वर्गात हळहळ व्यक्त होत आहे . कसबा बीड गावातील शंभो महादेव मंदीर , विठ्ठल मंदीर , ज्ञानेश्वर मंदीर , गोरोबा कुंभार मंदीर या मंदीरातील सर्व तिथी, हरीनाम सप्ताह सोहळे यामध्ये ते भाग घेत असत . शंभो महादेव मंदीरातील पालखी सोहळ्यात मृंदग वाजवत असत . प्रसिध्द गणेश मुर्तीकार म्हणून त्यांची ख्याती होती .

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks