मुरगुड येथे पाॅंईट टू स्पिअर पुस्तकांचे उत्साहात प्रकाशन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
प्रगती पब्लिकेशन कोल्हापूर प्रकाशित व प्रांजली प्रशांत पारकर लिखित पाॅंईट टू स्पिअर या पाचवी ते दहावी च्या भुमिती पुस्तकांवर आधारित पुस्तकांचे कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे, मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुमार ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड चे माजी प्राचार्य पी. डी. पाटील होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर चे उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, रविंद खराडे, सुहास खराडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रा. प्राजंली पारकर, शिवाजीराव सावंत, कुमार ढेरे, पी. डी. पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास कोजीमाशी चे माजी संचालक अरविंद किल्लेदार, नगरसेवक रवींद्र परीट, उपमुख्यापक संजय सुर्यवंशी, शक्तिसिंह सावंत, नवनाथ डवरी, महादेव खराडे, रविंद्र पाटील,सागर सापळे,नंदकिशोर खराडे, जगदीश सावर्डेकर, अशोक चंदनशिवे, राजेंद्र चव्हाण, प्रा.डी.एस. पाटील, प्रविण मांगोरे,प्रविण पारकर,प्रा.धनश्री चव्हाण, रुपालीताई तायशेटे, प्रा.सौ.आवटे प्रा,जे.टी.पवार ,नंदा सारंग ,वैशाली गुरव,एस.जे.गावडे,आदि मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक एम. बी. टेपुगडे यांनी केले.आभार शक्तिसिंह सावंत यांनी आभार मानले.