नियमांचे उल्लंघन होऊ न देता येणारा गणेशोत्सव आनंदात साजरा करा – उपनिरीक्षक राहुल वाघमारे

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषणा बाबतच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता येणारा गणेशोत्सव आनंदात साजरा करावा.गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा विभत्सपणा नसावा . तरूण मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन मुरगुडचे उपनिरीक्षक राहुल वाघमारे यांनी केले . ते शिंदेवाडी ता.कागल येथे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या नियोजनाच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते .
यावेळी बिद्रीचे माजी संचालक तसेच शिंदेवाडी गावचे माजी सरपंच दत्तामामा खराडे प्रमुख उपस्थित होते .
यावेळी दत्तामामा म्हणाले, सर्वोच्च्य न्यायालयाचे नियम सर्वांसाठी बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन पाळतीलच तसेच पोलिसांना पण कारवाहीचा प्रसंग येणार नाही . साऊंड सिस्टिम बाबतचे नियम सर्वांनी पाळावेत .
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम निर्बंध मुक्त केले असले , तरी हे निर्बंध कोरोनाच्या काळातील निर्बंध उठवले असून, ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम सर्वांना पाळावेच लागतील . जिल्हाधिकारी साहेबांनी घालून दिलेल्या वेळेच्या बंधनाचे नियम ही सर्वांना पाळावे लागतील . तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपनिरीक्षक राहुल वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस विजय माने, महादेव चव्हाण ,सतीश वर्णे यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दगडू माळी , राहुल खराडे ,अजित मोरबाळे यांचेसह गावातील सर्व मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच सदस्य उपस्थित होते.