ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी मंडळाच्या गणरायाचे महानगरपालिकेच्या विसर्जन कुंडामध्ये साधेपणाने विसर्जन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
गणपती बाप्पाच्या आगमनाने सगळीकडेच आनंददायी, चैतन्यमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आज कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती असलेल्या तुकाराम माळी मंडळाच्या गणरायाचे महानगरपालिकेच्या विसर्जन कुंडामध्ये साधेपणाने विसर्जन करण्यात आले.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्वांनीच यंदाचा हा गणेशोत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळून साधेपणाने साजरा केला. आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देत असताना आपण सर्वानी गर्दी न करता साधेपणाने पर्यावरणपूरक विसर्जन करावे असं पालकमंत्री ना. सतेज पाटील म्हणाले.
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!