मेघोली तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रूपये खर्च झाला होता तरीदेखील….

कडगाव :
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री फुटला. केवळ अडीच तासांत या तलावातील पाणी वाहून जाऊन तलाव रिकामा झाला आहे. मेघोली तलाव मधील पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिके पुर्णतः: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे या परिसरात ढगफुटी सारखे दृश्य झाले आहे.
१९९६ साली या तलावाच्या कामाला सुरुवात झाली. २००० साली या तलावात प्रथम पाणीसाठा करण्यात आला. ९८ दलघफू पाणीसाठा केला जात होता. या तलावाच्या कामासाठी सुमारे ४ कोटी ७० लाख रूपये खर्च झाले. सुरूवातीपासूनच या तलावात गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती.
तत्कालीन सभापती किर्ती देसाई यांनी पंचायत समितीच्या बैठकीत वेळोवेळी तलावाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. गत वर्षी आमदार प्रकाश आबिटकर, बाबा नांदेकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन गळतीची पाहणी केली होती. दुरुस्तीचा प्रस्ताव हा नाशिक येथे पाठविण्यात आला होता. तरी देखील दुरूस्तीसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत.
संबधित बातम्या :
ब्रेकिंग न्यूज : मेघोली धरण फुटले; नदीकडील बाजूच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
मेघोली धरण : एक महिला बेपत्ता,वाहून गेलेले चौघे जण झाडावर सापडले; चार जनावरे मृत