Emergency Alert Service सर्वांना आला दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट ; नेमका तो आहे तरी काय ?

अनेक भारतीयांच्या फोनमध्ये आज सकाळी सकाळी अचानक अर्लाम वाजू लागला व सर्वांना दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. हा अर्लट आणि मसेज नक्की काय आहे याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. अनेकांना आपला फोन हॅक होतोय की काय अशी भीती वाटू लागली. मोबाईलवर देण्यात आलेला हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपत्कालीन अलर्ट सेवेची चाचणी घेण्यासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सर्वांच्या फोनवर अचानक हा अर्लटचा पॉप मेसेज आला. हा मेसेज काय आहे व अशा प्रकारची आपात्कालीन संदेश सेवेची चाचणी घेण्यात येत आहे याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या अलर्ट बाबत भीती निर्माण झाली तर अनेकांनी हा मेसेज नक्की गर्व्हरमेंटचा आहे का अशी शंका व्यक्त केली. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीने याबाबत अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही तसेच ऑफिशियल ट्विटर हँडलवरही याबाबत काही सांगण्यात आले नाही.
आज (दि.20) सकाळी दहा वाजताच्या सुमारास अनेक नागरिकांचा फोन वाजू लागला. अनेकांना चालू फोन मध्ये पॉपअप मेसेज आले. यामध्ये हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपत्कालीन संदेश सेवेचा भाग आहे असे सांगण्यात आले. आपत्कालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपत्कालीन अलर्ट हवे आहेत का याबाबत विचारण्यात आले. त्यासाठी हो किंवा नाही असे दोन पर्याय देण्यात आले होते. आधी हा मेसेज इंग्रजी भाषेमध्ये तर नंतर मराठी भाषेमध्ये देण्यात आला. पॉपअप मेसेज आल्यानंतर काही नागरिकांना हा मेसेज व्हाईस स्वरुपात देखील देण्यात आला. हा मेसेज फक्त अँड्रॉईड वापरकर्त्यांना आला असून ॲपल आय़फोन वापरकर्त्यांना हा मेसेज आलेला नाही.