ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लज : कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसलेने नागरिकांना नाहक त्रास ; मनसेच्या वतीने हा कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकण्यात येईल : नागेश चौगुले यांचा इशारा

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गडहिंग्लज नगरपालिका हद्दवाढ वॉर्ड क्र.९ मधे गेली ३५ ते ४० वर्षापासून नागरिक वस्ती आहे. तेथे नागरी वस्तीत नगरपालिकेचा कचरा डेपो आहे.शहरातील सर्व कचरा गोळा करून तेथे आणून टाकला जातो. सदर प्रकलपाच्या कंपाऊंड भिंतीची उंची अंदाजे ५ फूट असून आतील कचरा अंदाजे १० ते १५ फुटापर्यंत ढिगारा स्वरूपात आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कचऱ्याचा दाबामुळे काही ठिकाणी भिंती पडल्या असून वाऱ्याने कचरा हा घरावर तसेच आतील बाजूस पडत आहे.

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसलेने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच भिंती पडून काही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सदर कचऱ्यामुळे आजूबाजूतील परिसरांना त्रास होऊ नये म्हणून योग्य ती औषध फवारणी झालेली तिथे दिसत नसून गटारींची अवस्था अत्यंत दनानिय झालेली आहे. कचरा तसेच इतर गोष्टी साचल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून येण्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

पालिका प्रशासनाने सदर प्रकल्पाकडे त्वरित लक्ष देऊन नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी विषयी तत्परतेने मार्ग काढावा अन्यथा मनसेच्या वतीने हा कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकण्यात येईल.होणाऱ्या परिणामस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks