‘गोकुळ’ वगळता सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर!

कोल्हापूर प्रतिनिधी :
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मंगळवारी ३१ ऑगस्टपर्यंत आणखी एकदा लांबवणीवर टाकण्यात आल्या आहेत. न्यायालयाचे आदेश असलेल्या संस्था या आदेशातून वगळण्यात आल्या आहेत. अनिल चौधरी यांनी याबाबतचे आदेश काढले. तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु राहणार आहे. तथापि गुरुवार ८ रोजी सर्वोच्च न्यायालयातील निकालावर गोकुळची निवडणूक अवलंबून आहे.
कोरोनाच्या सावटामुळे वार्षिक सभांवर निर्बंध आणले होते. ३१ मार्चपर्यंत सभा घेण्यास मुदतवाढ दिली होती. निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने काही संस्थांची वर्षिक सभा घेण्याची तयारी सुरु केली होती. मात्र तत्पूर्वीच जानेवारीमध्ये निवडणुका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. ३१ मार्चला याबाबतच मुदत संपली होती. मुदत संपूनही नव्याने आदेश न आल्याने संभ्रम तयार झाला होता. मंगळवारी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने संचालक मंडळास दिलासा मिळाला आहे.