ताज्या बातम्या
बेळगाव महानगर पालिकेतील निवडणुकीची कागदपत्रे मराठी मध्येही उपलब्ध करावी : मध्यवर्ती एकीकरण समितीचे निवेदन

बेळगाव :
बेळगाव महानगरपालिकेचीं निवडणूक जाहीर झाली असून 16 ऑगस्ट पासून निवडणूक प्रकियेला सुरवात झाली आहे… पण सदर निवडणूकमध्ये अर्जासह संबधित अन्य कागदपत्रे ही आयोगाने कन्नड भाषेमध्ये उपलब्ध केली आहेत. यासंबधी आज मध्यवर्ती एकीकरण समितीने सर्व कागदपत्र ही कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये ही उपलब्ध करावीत यासाठी जिल्ह्याअधिकारी यांना निवेदन दिले.उमेदवारी अर्ज हे फक्त्त कन्नड भाषेमधेच छापलेले आहेत त्यामुळे हे अर्ज मराठी भाषिकाना त्रासदायक ठरत असल्याने आज अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणीकर यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती एकीकरण समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात केले.