शिक्षणामुळे संस्कृत पिढी तयार होते .: आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य हे महान असते शिक्षणाच्या माध्यमातून नव्या संस्कृत पिढी निर्माण करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले
बहिरेश्वर ( ता. करवीर ) येथे सन १९९८ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या गावातील न्यु इंग्लिश स्कूल च्या प्रवेशद्वारच्या आयोजित उद्वघाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच युवराज दिंडे होते
आमदार आसगावकर म्हणाले ग्रामीण भागातील शेवटच्या थरापर्यत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहण्यासाठी सेवाभावी संस्थानी पुढाकार घेतला पाहिजे . प्रारंभी शाळेच्या १९९८ सालाच्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेशद्वार म्हणून भेट दिली त्यांचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले .
यावेळी सरपंच युवराज दिंडे . सरदार पाटील, सुनिल बचाटे, शिवाजी गोसावी . म्हारूळ गावचे सरपंच वंदना म्हाकवेकर, सागर चौगले , सुवर्णा दिंडे, आदिची भाषणे झाली . प्रास्ताविक जयवंत हावलदार यांनी केले शेवटी सागर दिंडे यांनी आभार मानले . यावेळी शिक्षक, ग्रामस्थ ,विद्यार्थी, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थितीत होते .