कोरोनामुळे ऐतिहासिक भवानी मंडप येथील साखर माळेची परंपरा यावर्षीही झाली खंडित

कोल्हापुर :रोहन भिऊंगडे
कोरोनामुळे ऐतिहासिक भवानी मंडप येथील साखर माळे ची परंपरा यावर्षीही झाली खंडित कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला गुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या माळेचे तोरण बांधले जाते. पण कोरोना मुळे यावर्षी ही परंपरा खंडित झाली आहे. गेल्या चार पिढीपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडुन तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तात्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झाले तेव्हा आनंद उत्सव म्हणून कोल्हापुरातील रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील 25 फुटाची साखरेची माळ बनवली होती. पंचवीस फुटांची असलेली ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती. ही परंपरा आजतागायत सुरु होती. मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे ही परंपरा सलग दुसर्या वर्षीही खंडित करण्यात आली आहे.