कुडूत्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन

कुडूत्री (प्रतिनिधी)
कुडूत्री (ता राधानगरी) येथील भिमशक्ती तरुण मंडळाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेकडकर यांची जयंती कोरोनाचे नियम पाळत साधेपणाने साजरी करण्यात आली.
या वेळ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिमेला अजित कांबळे आणि लखन कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन झाले
यावेळी जान्हवी चौगले,आर्या कांबळे,प्रतिभा कांबळे,अंकिता कांबळे,जोस्त्ना कांबळे,अंकिता कांबळे, आदी मुलींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट सांगितला.तर संजय डवर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मनोगत मांडणाऱ्या सर्व मुलींना शालेय साहित्य देण्यात आले.इथून पुढे आणखीन मुलांनी मनोगते मांडण्यासाठी पुढे यावे हा त्या मागील हेतू होता.या मुलांना उपस्थितांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात सदस्य राजश्री कांबळे,संजय डवर,पत्रकार सुभाष चौगले,दिनकर कांबळे,आदींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नारायण कांबळे (सर)यांनी तर आभार अजित कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष लखन कांबळे,उपाध्यक्ष,पंकज कांबळे,दिनकर कांबळे, ग्रा प.सदस्य राजश्री कांबळे, सातापा कांबळे,शिवाजी कांबळे,शरद कांबळे,बळवंत कांबळे, रमेश कांबळे,ऋषिकेश ब.कांबळे,सोहम कांबळे स्वप्नील कांबळे,अरुण कांबळे.आदी ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.