ताज्या बातम्या
यमगे येथे डॉ. श्रीकृष्ण देशमुख ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
यमगे (ता -कागल ) येथे डॉ. श्रीकृष्ण देशमुख ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते झाला .
गरजू व नव उद्योजकांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी ही पतसंस्था काम करणार असल्याचे चेअरमन शिवाजीराव वारके यांनी यावेळी सांगितले .
संस्थेच्या उभारणीत नूतन संचालक शिवाजीराव वारके (चेअरमन ), सुधीर मोहिते. (व्हा.चेअरमन ),संचालक अशोक महाजन, पांडुरंग कोंडेकर,प्रताप पाटील,सुनील विभुते, पांडुरंग कुंभार, म्हाळू डोणे, गजानन कांबळे, सौ नंदा नलगे,अर्चना किल्लेदार, सरपंच, सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.