सर्व शासकीय, खासगी रुग्णालयातील व कोव्हिड केअर सेंटरमधील मागील दोन महिन्यांतील कोरोना बाधित रुग्णांचे झालेल्या मृत्युंचे डेथ ऑडीट करण्यासाठी तालुकानिहाय समिती गठीत

रोहन भिऊंगडे /
कोल्हापूर, दि. 28: जिल्ह्यातील कोव्हिाड -19 संसर्ग होऊन कोरोना बाधित रुग्णांमध्ये होणारी वाढ तसेच गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युंमध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून योग्य ते वैद्यकीय उपचार उपलब्ध करून कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी कोरोना रुग्णांच्या मृत्युचे Death Audit करणे व त्यामधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे योग्य त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हयातील सर्व शासकीय, खासगी रुग्णांलयातील व कोव्हीड केअर सेंटरमधील मागील दोन महिन्यांतील कोरोना बाधित रुग्णांचे झालेल्या मृत्युंचे Death Audit करण्यासाठी तालुकानिहाय समिती गठित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
जिल्हयातील सर्व शासकीय, खासगी रुग्णांलयातील व कोव्हीड केअर सेंटरमधील मागील दोन महिन्यांतील कोरोना बाधित रुग्णांचे झालेल्या मृत्युंचे Death Audit करण्यासाठी खालीलप्रमाणे तालुकानिहाय समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीच्या बैठका प्रत्येक आठवड्यात एकदा किंवा आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीसाठी घेणेत याव्यात.
अ.
क्र. तालुका समिती प्रमुख समितीमधील सदस्य / सचिव
1 करवीर श्री वैभव नावाडकर,
उपविभागीय अधिकारी करवीर 1) श्री गुणाजी नलवडे, ता.आ.अ. करवीर
2) डॉ विद्या पॉल, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय,गांधीनगर
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
2 पन्हाळा श्री अमित माळी,
उपविभागीय अधिकारी, पन्हाळा 1) श्री अनिल कवठेकर, ता.आ.अ.पन्हाळा
2)डॉ. सुनिल अभिवंत, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय,कोडेाली
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
3 शाहुवाडी श्री अरूण जाधव,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
ग्रा.प., जि.प., कोल्हापूर 1) श्री हिरालाल निरंकारी, ता.आ.अ.शाहुवाडी
2)डॉ. प्रल्हाद देवकर, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, शाहुवाडी
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
4 हातकणंगले श्री विकास खरात,
उपविभागीय अधिकारी,इचलकंरजी 1)श्री सुहास कोरे, ता.आ.अ.हातकणंगले
2)डॉ. विलास देशमुख, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, हातकणंगले
3) डॉ रविंद्रकुमार शेटये, वैद्यकीय अधिक्षक, आय जी एम इचलकंरजी
4)डॉ. एम जी जमादार, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, पारगांव
5) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
5 शिरोळ श्री विकास खरात,
उपविभागीय अधिकारी,इचलकंरजी 1)श्री प्रसाद दातार, ता.आ.अ.शिरोळ
2)डॉ. सी एस खांबे, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, दत्तवाड
3) डॉ. एम बी कुंभोजकर, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरोळ
4) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
6 कागल श्री रामहरी भोसले,
उपविभागीय अधिकारी,
राधानगरी -कागल 1)श्री अभिजित शिंदे, ता.आ.अ.कागल
2) डॉ. सुनिता पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, कागल
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
7 आजरा श्री सोमनाथ रसाळ,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
महिला व बालविकास, जि.प., कोल्हापूर 1)श्री यशवंत सोनवणे, ता.आ.अ. आजरा
2)डॉ. फर्नाडीस, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, आजरा
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
8 गडहिग्लज श्रीमती विजया पांगारकर,
उपविभागीय अधिकारी,
गडहिंग्लज 1)श्री मल्लिकाअर्जुन अथणी , ता.आ.अ.गडहिंग्लज
2)डॉ. डी एस आंबोळी, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, गडहिंग्लज
3)डॉ. हर्षद व्हस्कले, वैद्यकीय अधिक्षक, नेसरी
4) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
9 चंदगड श्रीमती विजया पांगारकर,
उपविभागीय अधिकारी,
गडहिंग्लज 1)श्री अजयकुमार गवळी, ता.आ.अ.चंदगड
2)डॉ एस एस साने., वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, चंदगड
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
10 भुदरगड डॉ. संपत खिलारी,,
उपविभागीय अधिकारी, भुदरगड 1)श्री सचिन यत्नाळकर, ता.आ.अ.भुदरगड
2)डॉ भगवान डवरी, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय,गारगोटी
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
11 गगनबावडा श्री वैभव नावाडकर,
उपविभागीय अधिकारी करवीर 1)श्री विशाल चौकाककर, ता.आ.अ.गगनबावडा
2)डॉ एस बी थोरात, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय,गगनबावडा
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
12 राधानगरी श्री प्रसेनजित प्रधान,
उपविभागीय अधिकारी,
राधानगरी तालुका 1)श्री राजेंद्रकुमार शेटये, ता.आ.अ.राधानगरी
2)डॉ जी बी गवळी, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, राधानगरी
3) संबंधित तालुक्यातील खाजगी रुग्णालयातील 1 डॉक्टर प्रतिनिधी
सर्व समित्यांमध्ये तालुका मुख्यालयातील त्या त्या ग्रामीण रुग्णालयाचे / उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
वरीलप्रमाणे नियुक्त केले अधिकारी यांनी खालीलप्रमाणे कामकाज करणेचे आहे.
1) तालुक्यातील सर्व शासकीय, खाजगी रुग्णालये व कोव्हीड केअर सेंटर मधील मागील दोन महिन्यांमध्ये मृत्युं झालेल्या कोरोना –बाधित रुग्णांची यादी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेकडून प्राप्त करून घेणे.
2) संबंधित प्रथक प्रमुख यांनी मृत्युं झालेल्या कोरोना –बाधित रुग्णांचे Death Audit तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक व खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर यांचेकडून संयुक्तपणे पूर्ण करून घेणे.
3) रुग्णांच्या मृत्युबाबत प्रशासकीय व वैद्यकीय कारणे याबाबत चौकशी करणे.
4) रुग्णांच्या मृत्युबाबत प्रशासकीय किंवा हलगर्जीपणा झाले असल्यास त्याबाबत माहिती घेणे.
5) कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युंचे कारणाबाबत पडताळणी अंती भविष्यात मृत्यु होऊ नयेत म्हणून प्रशासकीय किंवा वैद्यकीय उपाययोजना / उपचार सुचविणे व त्याची अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे.
6) सविस्तर अहवाल तयार करून जिल्हास्तरीय कोव्हीड -19 मेडीको ॲडमिनीस्ट्रेटीव्ह मृत्यु पडताळणी समितीकडे सादर करणे.
सदर आदेशाची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. आदेशाचे उल्लघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील याची नोंद घेणेत यावी.