ताज्या बातम्यामहाराष्ट्र
हडलगे येथील ज्ञानेश्वरी पाटील बी. एच. एम. एस. पदवी उत्तीर्ण

नेसरी प्रतिनिधी : पुंडलीक सुतार
हडलगे ता.गडहिंग्लज येथील ज्ञानेश्वरी संजय पाटील हिने वैद्यकीय क्षेत्रातील बी एच एम एस ही पदवी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेबद्दल गावासह तालुक्यातुन तीचेवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे. सदर चे शिक्षण तिने महालक्ष्मी होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर रायगाव सातारा येथून घेतले असून यासाठी तिला प्राचार्य डॉ भानुसे व सर्व सहकारी डॉक्टर यांचे मार्गदर्शन लाभले.
वडील संजय पाटील (सचिव-श्री सरस्वती विकास संस्था सांबरे), आई सौ संजीवनी, भाऊ योगेश (मेकॅ.इंजि.), यांची प्रेरणा मिळाली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.