शिवानी कानकेकर यांना जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर

मुरगूड प्रतिनिधी :
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन अर्थात सर फाउंडेशन व महाराष्ट्र वुमन टीचर्स फोरम यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोगील खुर्द ( ता- करवीर ) येथील विद्यामंदीर शाळेच्या अध्यापिका सौ . शिवानी चंद्रशेखर कानकेकर ( कोल्हापूर ) यांची ” जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला शिक्षकांचा जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर व जळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी ८ शिक्षिकांची “जिल्हास्तरीय नारीशक्ती सन्मान पुरस्कार” साठी निवड करण्यात आली आहे.
सौ . शिवानी कानकेकर ( शास्त्रीनगर, कोल्हापूर ) यांचा समावेश आहे .
शिक्षिका म्हणून कार्यरत असताना शाळा स्तरावर राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम,
अध्यापन, सामाजिक कार्यातील सहभाग, कोविड काळातील योगदान यांचा विचार करूनच सौ . शिवानी कानकेकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .पुरस्काराचे वितरण लवकरच होणार आहे .सौ . शिवानी कानकेकर यांचा नुकताच राज्यस्तरीय उखाणा स्पर्धत प्रथम क्रमांक आला आहे .
या निवडीबाबत सर फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ महिला राज्य समन्वयक व राज्य वुमन टीचर फोरमच्या प्रमुख हेमा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयक रंजिता काळेबेरे व वर्षा निशाणदार यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे .