मॅकेनिकल बांधवांना महालक्ष्मी स्पेअर्सच्या वतीने जीवनावश्यक साहित्य वितरण

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
कसबा तारळे व परिसरातील टू व्हीलर,फोर व्हीलर,इलेक्ट्रिकल मेकॅनिक बांधवांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले.महालक्ष्मी स्पेअर्सच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संजयसिंह मोहिते होते.
गेले वर्षभर सर्वचजण आर्थिक परिस्थितीशी सामना करत आहे .कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे.कडक निर्बंधामुळे अनेक उद्योग व्यवसाय पूर्णत:बंदच आहेत.या पाश्र्वभूमीवर महालक्ष्मी स्पेअर्सचे मालक उत्तम हुजरे, ऋतुराज हुजरे यांनी कसबा तारळेसह परिसरातील पंचेचाळीसहून अधिक मेकॅनिकल बांधवांना गुडाळचे उपसरपंच दत्तात्रय कोथळकर,खिंडीव्हरवडेचे पो.पा राजू पोवार, संजयसिंह मोहिते,माजी सरपंच उमेश पाटील,लखन साबळे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
प्रारंभी स्वागत उत्तम हुजरे यांनी तर प्रास्ताविक रमेश साबळे यांनी केले यावेळी संजयसिंह मोहिते, दत्तात्रय कोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी अशोक पाटील, सात्तापा चौगले,उत्तम चौगले,योगेश कुंभार,धनाजी शिवुडकर,नौशाद जमादार,भगवान बचाटे,उमेश मोहिते,उत्तम पाटील,सुरज साबळे आदी उपस्थित होते.