ताज्या बातम्या

धुंदवडेत पोलिसांकडून गरजू कुटुंबाना जीवनावश्यक साहित्याचे वितरण

तरसंबळे प्रतिनिधी :

कोल्हापूर पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनाखाली पोलिस दलाने सुरु केलेल्या मिशन संवेदना या सामाजिक उपक्रमातून गगनबावडा पोलीसांच्याकडून धुंदवडे येथील गोरगरीब गरजू लोकांसह रस्त्यावर काम करणाऱ्या लमाण समाजातील ३२ कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

“मिशन संवेदना” या सामाजिक उपक्रमातून गगनबावडा पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुंदवडे, गौतमनगर,कावळटेक धनगरवाडा व विजापूर येथून रस्त्यावर काम करण्यास आलेल्या लमाण तांड्यासह ३२ गरजू गरीब कुंटुंबाना तांदुळ, तेल, साखर,डाळ,चटणी व चहापुड, साबण आदी जीवनाश्यक वस्तुचे वाटप केले. यावेळी पो.नि रणजित पाटील,सामजिक कार्यकर्ते एम.जी.पाटील, पोलिस पाटील तानाजी मोहिते, तानाजी कांबळे यांच्यासह गगनबावडा पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks