ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
दिगंबर परीट यांची राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता.कागल येथील कागल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, मुरगूड परीट समाज संघटक दिगंबर नामदेव परीट यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाच्या कागल तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
दिगंबर परीट यांनी कागल तालुका संजय गांधी निराधार समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा परीट समाजाचे संचालक, रयत विकास सेवा संस्थेचे उपसभापती म्हणूनही काम पाहिले आहे.