भुदरगड तालुक्याच्या सर्व गावातील घरांची तपासणी करा, तरच डेंग्यू आटोक्यात येईल : वैद्यकिय अधिकारी डॉ. मिलिंद कदम

गारगोटी प्रतिनिधी :
घराघरातील वापराचे पाणी आठवड्यातून एकदा बदला आणि गावागावांतील घरांची तपासणी करा तरच डेंग्यू चे रूग्ण आटोक्यात येवू शकतील.स्वच्छ पाण्यातच डेंग्यू चे डास अंडी घालतात त्यामूळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत गारगोटीच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ मिलिंद कदम यांनी व्यक्त केले. डेंग्यू च्या वाढत्या प्रसाराबध्दल विचारले असता ते माहिती सांगत होते.
गेले अनेक दिवस सातत्याने भुदरगड तालुक्यात डेंग्यू चे रुग्ण वाढत असल्याने भुदरगड तालुक्याच्या आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली असता डेंग्यू ची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन पातळीवर काहीही हालचाली दिसत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तापाथंडीच्या, सर्दिच्या साथीने खाजगी रुग्णालये हाऊस फूत्ल आहेत.एकेका घरात अनेक संख्येने रुग्ण सापडत आहेत.यामूळे तांबड्या पांढऱ्या पेशींचे संतूलन बिघडत आहे.डेंग्यू बरोबर अनेक साथीचे आजार जोर धरत आहेत. यावर्षी पडलेला भयंकर पाऊस, खराब झालेले पाणी, वातवरणात होणारे सतत बदल यामूळे या आजाराचे प्रस्थ वाढले आहे.डैंग्यू इतका वाढूनही शासनाकडे या वाढत्या रुग्णसंख्येची नोंद नाही. हा आजार घालवण्यासाठी शासन पातळीवर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना अद्याप तालुक्याच्या आरोग्य विभागाने केल्या नाहीत. एकाही ग्रामपंचायतीने डेंगू बाबत दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. वाढत्या डेंगू आजाराला पायबंद घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य जागृती करण्याची गरज असल्याचे वैद्यकिय तज्ञातून बोलले जात आहे.