वादळी वाऱ्यानं मेंढपाळांचा आसराच मोडला !!

सावरवाडी प्रतिनिधी/ शिवराज लोंढे
गेल्या दोन दिवसापासुन वादळी वाऱ्याबरोबर जोरदार पावसामुळे ग्रामीण भागातील मेंढपाळ व्यवसायिकांचे जगणेच मुश्कील झाले आहे .. शेळ्या मेंढ्या जनावरांचा भर पावसात आसराच मोडला गेला आहे .
अंगावरचा प्लास्टीक कागद फडफडून उडून जायचं .अजाड माळावर मेंढपाळांचे पालं सुध्दा वाऱ्यानं उडाली . शेतीमध्ये पावसाचे ठपोरे थेंब झेलत साचलेल्या पाण्यात जनावरे रात्रभर उभी असायचं भुकेने व्याकूळ झालेल्या मेढपाळांची मात्र पावसाने दैनाच उडवली गेली . वादळी वाऱ्यानं मात्र मेंढपाळ व्यवसायिकांचा आसराच मोडला दोन दिवसापासुन चक्री वाऱ्या बरोबर वादळी पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले . वेगवान वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील मेंढपाळ व्यवसायिकांचे हाल होऊ लागले, दिवसभर रानावनात , नद्यांच्या काठी ओढ्यांच्या परिसरात शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी नेण्याचे काम करून विसाव्यासाठी पालं उभारण्यात येते तोच वादळी वाऱ्याचा दणका आणि थंडगार हवा , पावसाचे ठपोरे थेंब झेलीत शेतीमध्येच उभे रहायचे , पावसाळ्याच्या दिवसात मात्र ग्रामीण मेंढपाळांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते
उन्ह , पाऊस , थंडी , याची तमा न बाळगता मेंढपाळ लोक आपला मेंढपाळ व्यवसाय चालवितात . त्याच्यावर कधी काळी निसर्ग सुध्दा कोपतो . भर पावसात मेंढपाळ व्यवसायिकांचे होणारे हाल पहाता प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात