धनंजय महाडिक यांनी माजी कळ तेवढी काढू नका, मी तुमच्या भीमा कारखान्याचे काढले तर फार वाईट परिणाम होईल : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापुर :- रोहन भिऊंगडे
गोकुळ निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलं आहे. या राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी आज माजी खासदार धनंजय महाडिक यांना खडे बोल सुनावले. यावेळी बोलताना मुश्रीफ असं म्हणाले की धनंजय महाडिक यांना सांगेन की माझी कळत तेवढी काढू नका मी तुमच्या भीमा कारखान्याच काढल तर फार वाईट होतील अश्या शब्दात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मा.खासदार धनंजय महाडिक यांना सुनावले आहे. मुश्रीफ आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी धनंजय महाडिक यांनी गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने तीनही मंत्र्यांवर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ कोणी मोडून खाल्लं ते माहिती आहे. नोकऱ्यांचा बाजार कुणी मांडला तेही सर्वाना माहिती आहे. धनंजय महाडिक यांना मी सांगेन की माझी कळ तेवढी काढू नका आम्ही संस्था चालवल्या आहेत. सतेज पाटील यांनीही कारखाना चालवला आहे. जिल्हा बँक ही मी उत्तम रित्या चालवली आहे. तुमच्या भीमा कारखान्याचे जर मी काढलं तर फार वाईट होईल. यामुळं ते बोलन ताबडतोब बंद झालं पाहिजे. आपण पॉझिटिव्ह प्रचार करू मी जर काढलं तर सगळ्यांची तोंडं बंद होतील. अशा शब्दात मा.खा. धनंजय महाडिक यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.