ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यातील बोगस बांधकाम कामगार नोंदणीची चौकशी व्हावी ; जिल्हाधिकारी व कामगार आयुक्तांना निवेदन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्ह्यात बोगस बांधकाम कामगार नोंदणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. बोगस कामगारांना दाखला देणाऱ्या इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर यांची सखोल चौकशी करून त्यांचे लायसन्स रद्द करण्यात यावे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अन्यथा खऱ्या बांधकाम कामगारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे माजी कागल तालुकाध्यक्ष विजय मारुती राजीगरे यांनी जिल्हाधिकारी व कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे.