कोल्हापूर : पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील यांच्या हस्ते फुड पॅकेट्स व पाणी वाटप

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
परिवर्तन फाउंडेशन,लहुजी साळवे प्रतिष्ठान व सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे बिंदू चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मास्क, सॅनिटायजरचा वापर करून पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या हस्ते फुड पॅकेट्स व पाणी बॉटल्सचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजितभाऊ चव्हाण,परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे,
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, ॲड.दत्ताजीराव कवाळे,ॲड.राहुल सडोलीकर,आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष आठवले, समीर विजापूरे,प्रा.आनंद भोजने,निवास सूर्यवंशी,मोहन कांबळे,अमोल इसापुरे,कार्याध्यक्ष प्रभाकर कांबळे,गजानन कुरणे,ॲड.सरदार किरवेकर,ॲड. प्रमोद दाभाडे,राज कुरणे,किसनबापू भोसले आदी उपस्थित होते.