कोल्हापुरातील युवकाचा मुरगुडमध्ये मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूडात भाच्याकडे राहावयास आलेला कोल्हापुरातील राजेंद्र नगरचा युवक काल सकाळी मुरगुड येथील गावभागातील एका बागेत मयत स्थितीत आढळून आला. प्रभाकर भिमराव भोसले (वय ४३ ) असे मयत युवकाचे नाव असून घटनेची नोंद मुरगूड पोलिसात करण्यात आली आहे.
पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, राजेंद्रनगर मधील घरी एकटाच राहणारा प्रभाकर भिमराव भोसले हा मुरगूडातील भाचा रोहीत खवले याच्या घरी पंधरा दिवसापूर्वी राहणेस आला होता. तो दिवसातुन बराच वेळ घरा बाहेरच थांबायचा.काल रविवारी सकाळी ७. ३० नंतर तो घराबाहेर गेला. दरम्यान गावभागातील मारुती मंदिराच्या मागे असणाया विजयमाला मंडलीक उद्यानामध्ये तो सकाळी ११. ३० वा. च्या सुमारास मयत स्थितीत मिळून आला.
रोहीत खवले याने पोलिसात वर्दी दिली. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत प्रभाकर भोसले हा अविवाहीत होता.