ताज्या बातम्यामहाराष्ट्र
#Nashik : बेडसाठी आंदोलन करावा लागलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू

नाशिक :-
वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक मध्ये घडली आहे.
सिडकोच्या कामटवाडा भागात राहणाऱ्या बाळासाहेब कोळे असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
कोरोना बाधित असूनही गेल्या तीन दिवसांपासुन व्हेंटिलेटर बेड मिळत नसल्याने मयत युवकाने नातेवाईकांसह थेट महापालिका मुख्यालयात आंदोलन केले होते.
आंदोलनानंतर त्याला मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सदर रुग्णाची ऑक्सिजन लेवल खालावली होती, त्यावेळी व्हेंटिलेटर न देता केवळ ऑक्सिजन बेड दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.