ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक भान जपत किशोरवयाला सामोरे जा- डॉ. जयश्री रामसे

कुडूत्री प्रतिनिधी :

किशोरवयीन वयात होणारे बदल हे दैवी देणगी आहे,या बदलाचा स्वीकार करत स्व- सुरक्षितते बरोबर सामाजिक भान जपत किशोरवयाला समोरं जाण्याचा सल्ला प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ जयश्री रामशे यांनी दिला, त्या राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच वंदना शिंदे होत्या.
राष्ट्रीय महिला दिन आणि स्वर्गीय द्रौपदी दत्तात्रय एरुडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उल्लेखनीय यश मिळवलेल्या किशोरवयीन मुलींचा सत्कार,सॅनिटरी नॅपकिन ,आरोग्य विषयक साहित्य आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले, यावेळी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ जयश्री रामशे यांनी आपल्या व्याख्यानातून किशोरवयीन मुलींनी आरोग्याची घ्यावयाची काळजी आणि समाजभान याविषयी मार्गदर्शन केलं, अभियंता प्रियांका एरुडकर यांनी भविष्यातील संधीविषयी मार्गदर्शन केलं,
यावेळी मुलीना प्रोत्साहन मिळावे, त्याना स्पर्धा परिक्षेचे ज्ञान व्हावे यासाठी प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास डॉ माधुरी कोपार्डेकर,तालुका कृषी अधिकारी सारिका वसगावकर, प्रियांका एरुडकर,अमृता एरुडकर,सरपंच वंदना शिंदे,आयेशा तहसीलदार, मंगल शिंदे,स्मिता तिबीले,सारिका पाटील, शोभा एरूडकर, सुमन एरूडकर, पुनम एरूडकर आणि सुप्रीया रणदीवे यांच्यासह किशोरवयीन मुली आणि महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्योती एरूडकर यानी तर प्रास्तावीक डाँ. माधूरी कोपार्डेकर यानी तर आभार अमृता एरूडकर यानी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks