दुग्ध व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला : विश्वासराव पाटील; शिरोली दुमाला येथे जागतिक दुध दिन साजरा

सावरवाडी प्रतिनिधी :
कोरोना काळात दुध व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा विकास साधला जगभरात दुध व्यवसाय हा आर्थिक स्थैर्यप्राप्त करणारा ठरला आहे . दर्जेदार दुधउत्पादनातून नवे परिवर्तन घडत आहे . दुग्ध क्रांतीमुळेच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास घडत असल्याचे प्रतिपादन गोकूळ दुध संघाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी केले
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे जागतिक दुध दिनांचे औचित्य साधून छत्रपती शाहू दुध सहकारी संस्थेतर्फ आयोजित दुध उत्पादकांना माक्स व सॅनिटायझर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील होते .
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणच्या काळात दुध व्यवसायामुळे अनेकांना आर्थिक आधार मिळाला आहे . दुधसंकलन वेळी संस्थानी शासनाच्या नियमांचे कडक पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून विश्वासराव पाटील म्हणाले सोशल डिस्टन्सचा अवलंब करून दुध संकलन करावे.
यावेळी संस्थेतर्फ दुध उत्पादक सभासदांना माक्स . सॅनिटायझर . यांचे वाटप गोकूळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, विरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापूरे . माधव पाटील ,माजी सरपंच एस के पाटील , बलाभिम विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष राहूल पाटील , तुकाराम पाटील , अशोक पाटील , आदिनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सचिव संजय पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले शेवटी के वाय पाटील यांनी आभार मानले . यावेळी सोशल डिस्टन्स चे कडक नियम पाळण्यात आले होते.