ताज्या बातम्यामहाराष्ट्र
अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली :
ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली.
यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, “देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.”