ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वन्यजीव विभागाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
जागतिक पर्यटन दिनानिमित्य व पर्यटन सप्ताह अंतर्गत वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या विद्यमाने राधानगरी फॉरेस्ट ऑफिस ते दाजीपूर अभयारण्य अशा 45 कि.मी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 वाजता वन्यजीव विभागाकडून रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली . रॅलीमध्ये 6 वर्षांपासून ते 65 वर्षातील जवळपास 25 ते 30 सायकलिस्ट सहभागी झाले होते.