ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा ; आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सकल मराठा समाजाची मागणी

 प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांना सकल मराठा समाज संचलित सकल मराठा प्रतिष्ठानने निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मराठा समाजासह इतर जातींना २६ जुलै १९०२ रोजी आरक्षण लागू केले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, राज्यात बहुसंख्येने असणारा मराठा समाज गेले अनेक वर्षे आरक्षणासाठी संघर्ष करीत आहे. हा समाज मुख्यत्वे शेती व रोजगारावर उपजीविका करणारा समाज आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास ठरवूनही ५० टक्क्यांमध्ये आरक्षण न मिळाल्यामुळे ते न्यायालयामध्ये टिकले नाही. मराठा समाजाला कायदेशीर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये आपण लोकप्रतिनिधी या नात्याने विषय चर्चेस घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

यावेळी सकल मराठा समाजाचे प्रताप ऊर्फ भैय्या माने, नितीन दिंडे, नितीन काळबर, नाना बरकाळे, प्रवीण काळबर, सतीश पवार, संग्राम लाड, केरबा पिष्टे, योगेश पाटील, अमित पाटील, दिग्विजय डुबल, प्रशांत म्हातुगडे, मंगेश पिष्टे हे प्रमुख उपस्थित होते. तसेच कागल शहरातील नवल बोते, सतीश घाडगे, इरफान मुजावर, गंगाराम शेवडे, अमर सणगर यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks