ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर महापालिकेला नूतन आयुक्तांची नियुक्ती करा ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन

कोल्हापूर महापालिकेला गेले दोन आठवडे आयुक्त नाहीत.त्यामुळे नागरी समस्या भेडसावत आहेत. लवकरात लवकर नूतन आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा व शहर नागरी कृती समितीने केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
‘शासन आपल्या दारी ? अगोदर आयुक्त पाठवा कोल्हापुरी!’, असेही निवेदनात म्हटले आहे. शासनातील अनेक मंत्री नुकतेच कोल्हापुरात येऊन ‘शासन आपल्या दारी’, असे सांगू गेले. मंत्री येणार म्हणून दौऱ्याच्या तयारीसाठी तीन आठवडे प्रशासन मग्न होते.
त्यामुळे पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती या मूलभूत सुविधाही विस्कळीत झाल्या. ज्या मार्गावरून मंत्री जाणार होते, तो भाग एकदम चकचकीत बाकी सर्व शहर भकास आहे, असेही विनोद डुणुंग, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर, सुरेश कदम, लहुजी शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.