विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्या ठेवी ५५ कोटी : प्रवीणसिंह पाटील ; ७३ वी सवर्साधारण सभा खेळीमेळीत

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेने आर्थिक वर्षात ५५ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा गाठला आहे. तसेच बँकेला ३८ लाखांचा नफा झाला असून संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे बँक सर्वांर्थांने सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरली असल्याची माहिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी केले.
येथील कॉ. दत्ता देशमुख सभागृहात पार पडलेल्या बँकेच्या ७३ व्या सर्वसाधारण सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.सभेच्या सुरवातीस सहकार महर्षी विश्वनाथराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मळगे येथील ज्येष्ठ सभासद आनंदराव पाटील यांच्या हस्ते झाले.यावेळी चिमगावचे बाळासो आंगज,मारुती मेंडके,संजय मोरबाळे, राहुल वंडकर यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सभेचे कामकाज पार पडले.
स्वागत प्रास्ताविकातून प्रविणसिंह पाटील यांनी बँकेने राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतना बँके समोर विविध समस्या निर्माण होत आहेत . त्यामुळे कर्मचारी वर्गाला सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करताना अडचणी येत आहेत.कर्ज देताना किंवा ठेवी ठेवताना विविध नियमांचा वापर करावा लागतो . अशी तक्रार काही सभासद करतात .पण बँक प्रगती पथावर आणण्यासाठी हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.कर्मचारी आणि सभासद यांच्या पाठबळावर सतत अ ऑडिट वर्ग मिळत आहे.कर्ज वसूल करताना काही कर्जदार त्रास देतात . अशावेळी सभासदांनी कर्मचाऱ्यांना पाठबळ द्यावे. बँक राजकारण विरहित ठेवून या पुढे ही आपण सभासदाभिमुख कारभार करणार असल्याचे सांगून सभासदांनी बँकेकडून कर्जे घ्यावीत तसेच ठेवीही मोठ्या प्रमाणात ठेवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.
अहवाल व नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वासराव चौगले यांनी केले.सभेस उपाध्यक्ष वसंतराव शिंदे ,संचालक विश्वासराव घाटगे ,एकनाथ मांगोरे, साताप्पा पाटील, बाळासो पाटील, गणपती लोकरे , आनंदा पाटील,सुधीर सावर्डेकर, सचिदानंद कुलकर्णी, पांडुरंग पाटील, लक्ष्मी जाधव, रेवती सूर्यवंशी, विजय शेट्टी, एकनाथ पाटील,मारुती कांबळे, बाजीराव इंगळे ,बाजीराव रजपूत ,संजय हावळ, नंदू दबडे, बाळकृष्ण लोकरे, जहांगीर नायकवडी, रवींद्र जाधव,मारुती घाटगे आदी प्रमुख उपस्थित होतेे .आभार उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.