ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुडात कोरोनाची नव्याने एंट्री ; दोघे पॉझिटिव्ह

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड शहराला पुन्हा कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर पुण्याहून आलेल्या एकाचा खासगी लॅबमधून अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली.या कुटुंबाच्या प्रथम संपर्कातील १२ जणांचे स्वब घेतल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली आहे. मुरगूड शहरात २४ फेब्रुवारीला एका वृद्धाचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता.
आता सव्वा महिन्याने मुरगुडात कोरोनाने नव्याने एंट्री केल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण
झाले आहे. दरम्यान,नगरपालिका व आरोग्य प्रशासनाने नागरिकांना मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिग आणि नियमित हात धुणे, स्वच्छता ठेवण्याचे व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.