ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला, नियम न पाळल्यास काही भागात लॉकडाऊन करावे लागेल- मुख्यमंत्री ठाकरे

नवी मुंबई:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोविड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना नियम न पाळल्यास काही भागात लॉकडाऊन करावे लागेल, असे म्हटले आहे.
राज्यातील अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागपुरात कोरोनाचा उद्रेक झाल्याने तेथे १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता राज्यातील काही भागात लॉकडाऊन करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नियम न पाळल्यास काही भागात लॉकडाऊन करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लस घेतल्यानंतर सांगितले. लसीकरण करुन घ्या. अनावश्यक गर्दी टाळा. मास्क लावा, असे आवाहन त्यांनी केले. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी काळजी घ्या, असे त्यांनी म्हटले आहे.