शिरगाव मध्ये कोरोना योध्यांचा सत्कार

कौलव प्रतिनिधी :
शिरगाव ता.राधानगरी येथे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची सात वर्षे पुर्ण झालेबद्ल पुर्ण देशभर ज्या कोरोना योध्यांनी सन २०२० व २१ साली स्वत:चा जीव धोक्यात घालून संपूर्ण दिवस रात्र काम केले अशा योद्धयांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन भाजपाचे जिल्हा चिटणीस डाॅ.सुभाष जाधव यांचे हस्ते सत्कार करणेत आला.
यावेळी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक तलाठी डॉक्टर असि.डाॅक्टर सर्व सफाई कामगार आशा स्वंयसेविका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ.रुपाली व्हरकट उपसरपंच मा.उपसरपंच सातापा पाटील सौ.सुनिता पाटील सौ.संजीवनी पाटील श्री. दिनकर चरापले श्री. कपिल व्हरकट ग्रामविकास अधिकारी श्री. अशोक भांदिगरे डॉ.सुभाष जाधव डॉ.कृषिकेश जाधव.असि.डाॅक्टर सात्तापा भिवसेकर श्री. राजेंद्र व्हरकट राजेंद्र पाटील अजित पाटील मारुती गुरव उपस्थित होते.