कोरोना लसीकरणाची मोहिम ही सामाजिक चळवळीला प्रोत्साहन द्यावे : राजेंद्र सुर्यवंशी यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना लस घेणे सोईचे झाले आहे. . गावागावात कोरोना लसीकरण्यासाठी ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकत्यांनी लसीकरण मोहिम ही सामाजिक चळवळ म्हणून प्रोत्साहन द्यावे .असे प्रतिपादन माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.
करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सूर्यवंशी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव तिबीले होते .
यावेळी गोकुळचे संचालक सत्यजित पाटील, शामराव सूर्यवंशी, , महे गावचे सरपंच सज्जन पाटील एस डी जरग आदिनी मनोगत व्यक्त केले . प्रारंभी शिरोली दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्र व कसबा बीड आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका यांचा कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी केले. मेहबुब शेख यांनी आभार मानले यावेळी दिनकर सूर्यवंशी, आत्माराम वरुटे, कसबा बीडच्या उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य दिनकर गावडे, सचिन पानारी, वैशाली पाटील, जयश्री कांबळे, अंजना कुंभार, महेगावचे उपसरपंच रूपाली बोराटे, शामराव कुंभार यांच्यासह आरोग्य विभाग कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.