कोल्हापूर : कोरोना बाधित बालकांसाठी कृती दल गठीत

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे
लहान मुलांमध्ये कोव्हीड -19 या संसर्गजन्य आजाराचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी तसेच या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर कोव्हीड -19 बाधित बाल रुग्ण -जिल्हा टास्क फोर्स /समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
ही समिती पुढीलप्रमाणे :-
डॉ. सौ संगीता कुंभोजकर, (9822507858) अध्यक्ष व इतर सदस्य सर्वश्री डॉ. अनिल कुरणे, (9823126854), डॉ. व्यंकटेश तरकसबंद (9272861258), डॉ. दशावतार बडे (9822059818), (9823363320) आणि डॉ. युवराज पाटोळे (9766924178).
या टास्क फोर्स / समितीने जिल्ह्यातील सर्व रुग्णालये व जिल्हा प्रशासनास मार्गदर्शक सूचना करणे व त्यांचे अंमलबजावणीस सहकार्य करणे अपेक्षित आहे.
1. सर्व कोव्हीड रुग्णालयात बालरुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उदा. एनआयसीयु, आयसीयु बेड, व्हेटिंलेटर, इत्यादी सुविधा, लहान मुलांसाठी कोव्हीड रुग्णालयात स्वंतत्र कक्ष निर्माण करणे, याबाबत जिल्हयातील सर्व रुग्णालयांना व जिल्हा प्रशासनास मार्गदर्शन करणे.
2. लहान मुलांमध्ये कोव्हीड -19 संसर्गाचा वाढत्या प्रादूर्भावास आळा घालण्यासाठी नियमित बैठका घेऊन, व रुग्णालयांना क्षेत्रीय भेटी देऊन जिल्हा प्रशासनास विविध उपाययोजना सुचविणे.
3. कोव्हीड -19 बाधित लहान मुलांचे बाबतीत रुग्ण व्यवस्थापन संहिता ( Patient Management Protocol)व औषधोपचार संहिता, शासनाकडील मार्गदर्शक सूचना व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
4. लहान मुलांसाठी निश्चित करणेत येणाऱ्या कोव्हीड -19 रुग्णालयात विशेषज्ञ डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांची आवश्यकता सुनिश्चित करणे व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने त्याची अंमलबजावणी करणेसाठी सहकार्य करणे.
5. कोव्हीड -19 मुळे बाधित झालेल्या गंभीर व अतिगंभीर बाल रुग्णांची दैंनदिन तपासणी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) रुगणालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख व वरिष्ठ विशेषज्ञामार्फत तपासणी करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करणे व त्यांची अंमलबजावणी करणेसाठी मार्गदर्शन करणे.
6. कोव्हीड -19 बालरुग्णांमधील मृत्युदर कमी ठेवणे व बालरुग्णांचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत वेळोवेळी रुग्णालयाची पाहणी करणे, कोव्हीड वॉर्डला भेट देणे, व्यवस्थापनात सुधारणा करणे, रुग्ण व्यवस्थापनात हलगर्जीपणा होत आहे असे निदर्शनास आल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित करणेसाठी सूचित करणे.
7. रुग्णालय व बाल रुग्ण व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाची मदत घेणे.
8. समितीच्या बैठका दर 03 दिवसांनी किंवा आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीतही घेता येतील.
9. सदर समिती / टास्क फोर्सचा एक स्वतंत्र Whats app Group तयार करून या ग्रुपमध्ये समितीने निर्गमित केलेल्या निर्देशाचे पालन करण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे अन्य डॉक्टर्स, विशेक्षज्ञाचाही समावेश करणेत यावा.
10. नेमून देणेत आलेले कार्य पार पाडण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण असेल अथवा एखाद्या बाबीवर मार्गदर्शन आवश्यक असेल तर सदर समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यस्तरीय टास्क फोर्सशी समन्वय साधणे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारे व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाईस पात्र राहील.