ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुदाळ येथे उमेद स्टोअरचे उद्घाटन

मुदाळ प्रतिनिधी : प्रकाश पाटील
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामविकास खात्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या MSRLM या अभियाना अंतर्गत उमेद स्टोअर मुदाळ येथे उद्घाटन बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका व्यवस्थापक सविता कांबळे,प्रभाग समन्वयक प्रवीण कांबळे,जीवनज्योती ग्रामसंघाचे सर्व महिला पदाधिकारी,माहेर सखी फौंडेशनच्या अध्यक्षा सौ राजनंदिनी पाटील, सचिव सौ शरयू तुकाराम पाटील, खजाणीस माया प्रवीण पाटील, सरपंच शीतल माने, माजी सरपंच विकास कृष्णराव पाटील, पं स सदस्य संग्रामसिंह देसाई, माजी सभापती बापूसो आरडे, व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व स्वागत पूजा रवींद्र पाटील यांनी केले.