समाजाच्या उन्नतीकरिता नेहमी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा सन्मान ही देशसेवा : भाजपा नेते हंबीरराव पाटील यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन समाजाच्या उन्नतीकरिता कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा सन्मान हीच खरी देशसेवा असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी केले .
करवीर तालुक्यातील चाफोडी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात भाजप करवीर तालुका तर्फ आयोजित कोरोना योध्दांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच पंढरीनाथ भोपळे होते . यावेळी सोशल डिस्टन्सचे सर्वं नियम पाळून कोरोना योध्दा म्हणून पोलीस पाटील, डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी सेविका नर्स यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले
कार्यक्रमात पोलीस पाटील गजानन खोत, डॉ मनिषा पाटील, पत्रकार शिवराज लोंढे , सरपंच पंढरीनाथ भोपळे, भाजप युवा आघाडीचे अक्षय वरपे, आदिची भाषणे झाली . प्रारंभी प्रास्ताविक पत्रकार डॉ निवास वरपे, यांनी केले . शेवटी कृष्णात पाटील यांनी केले यावेळी भाजपा कार्यकर्त संभाजी पाटील, राजाराम चव्हाण, सागर भोगम, सागर मोहिते . पोलीस पाटील सागर शिंदे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थितीत होते .