बांधकाम कामगारांनी कल्याणकारी मंडळाचा लाभ घ्यावा : कॉ शिवाजी मगदूम

सिद्धनेर्ली प्रतिनिधी :
बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत होऊन कल्याणकारी मंडळाचा लाभ घ्यावा, असे आव्हान लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव काॅ. शिवाजी मगदुम यांनी केले ते नदी किनारा, सिध्दनेर्ली येथे बांधकाम कामगारांना स्मार्टकार्ड वाटप कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते.
यावेळी बोलताना कॉ.शिवाजी मगदूम पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे व त्यांना कल्याणकारी योजना द्याव्यात यासाठी लाल बावटा संघटनेने सन 2004 पासून महाराष्ट्र सरकारसोबत संघर्ष केला. आणि सन २०११ साली, बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन होऊन बांधकाम कामगारांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात झाली. नोंदीत झालेल्या बांधकाम कामगारांनी उर्वरित बांधकाम कामगारांना नोंदीत करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असे अहवानही केले.
यावेळी संघटनेचे तालुका खजानिस कॉ विनायक सुतार, म्हणाले लाल बावटा संघटनेच्या लढाऊ बाण्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना चांगले दिवस आलेले आहेत. महाराष्ट्रातील लढाऊ संघटना म्हणून ओळख असलेल्या लाल बावटा संघटनेमध्ये सहभागी व्हावे व आपल्या न्याय हक्कासाठी संघटनेसोबत रहावे असे अहवानही यावेळी सुतार यांनी केले.
यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे प्रतिनीधी मान. राहुल निकम, प्रकाश रामाणे, हेमंत कांबळे, गणेश पाटील, रमेश कांबळे, रंगनाथ सुतार,बंडा भांडवले, के वाय जाधव,रावसाहेब पाटील आदीसह कामगार उपस्थित होते.