संविधान जनजागृती चळवळ :: पहिली प्रत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देऊन चळवळीला प्रारंभ.

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान’ उपक्रम माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सुरुवात केली यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले सविधान चळवळ ही काळाची गरज असून सविधान जनजागृती समितीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘माझे संविधान, माझा अभिमान’ उपक्रमास शासन स्तरावर आम्ही सहकार्य करु,
यावेळी संविधान उद्देशिका मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देऊन सविधान जनजागृती चळवळीचा शुभारंभ केला.
यावेळीकोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये घराघरात सविधान या माध्यमातून ‘माझे संविधान,माझा अभिमान’ हा उपक्रम राबविला जाणार आहे.या वेळी संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले जाणार आहे.महाराष्ट्र एनजीओ समिती,अंतर्गत
संविधान जनजागृती समिती, (महाराष्ट्र राज्य) तर्फे यासंदर्भात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम
संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन
भारतीय संविधान निर्मिती करणाऱ्यांना अभिवादन
२६ नोव्हेंबर १९४९ हा संविधान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.घटनाकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी गठीत समितीने ती स्वीकारली.त्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यघटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये ‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती
महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिली.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे,आदरांजली वाहणे;त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्त्वे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील युवक-युवतीच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. असे मत महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्यसंपर्क प्रमुख संदीप बोटे यांनी दिली.
कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? राज्यघटना नेमका काय प्रकार आहे?असे अनेक प्रश्न युवक-युवतीना व नागरिकांना पडतात.भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे, सर्व समावेशकता युवक-युवतीच्या मनावर कोरली जावीत या अनुषंगाने ‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र एनजीओ समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप सरदेसाई यांनी घेतला आहे.
यावेळी ते या संदर्भातील माहिती सांगत असताना म्हणाले, स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, या दृष्टिकोनातून सविधान घराघरात या हॅशटॅगखाली 4 फेब्रुवारी ते २६ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत सदर उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये राबवला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत
प्रत्येक गावातील वाचनालयांना सविधान , सदर संदर्भातील इतर पुस्तके वाटप कार्यक्रम,
संविधान वाचन कार्यक्रम,
सविधान उद्देशिका प्रकाशन, अर्पण कार्यक्रम इ. विविध उपक्रम राबवले जाणार आहेत; जेणेकरून युवक-युवतीना व नागरिकांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. सदर अभियानामध्ये ज्यांना स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचे आहे अशा सर्व इच्छुक नागरिकांनी व युवक-युवतींनी समितीशी संपर्क साधावा.