श्री कलमेश्वर मंदिर परिसर विकास कामापासून कालकुंद्रीत विकास कामांना प्रारंभ

नेसरी प्रतिनिधी: पुंडलिक सुतार
जि प सदस्य मा. कल्लापाणा भोगण यांच्या फंडातून कालकुंदरी येथील श्री कलमेश्वर मंदिर परिसरात रु 5 लाखाचे पेव्हिंग ब्लॉक्स बसवून नवीन निर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी विकास कामाची मुहूर्तमेढ रोवली.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्री एम जे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ल व श्री अशोक पाटील यांच्या बिनशर्त पाठिंब्याने निवडून आलेल्या नूतन कार्यकारिणीने मा कल्लापना भोगण यांच्याकडे पाठ पुरावा करून 5 लाखाचा जि प फंड उपलब्ध केला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मंदिर परिसरातून विकास कामाचा प्रारंभ करण्याच्या उद्देशाने पेव्हिंग ब्लॉकस बसवून परिसर सुशोभित केला.
या कामाचे लोकार्पण श्री एम जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा कल्लापना भोगण आणि सौ विद्या विलास पाटील जि प सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी मा कल्लापना भोगण व सौ विद्या पाटील यांचा ग्रामपंचायतिच्या वतीने उपसरपंच श्री संभाजी राणबा पाटीलआणि सरपंच सौ छाया जोशी यांच्या हस्ते व सप्ताह कमिटीच्या वतीने सप्ताह कमिटी अध्यक्ष श्री शंकर पाटील व श्री कडोलकर गुरुजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री विलास शेटजी , अझरोद्दीन शेख, प्रशांत पाटील विठोबा पाटील, गीता नाईक, स्वागता कदम, गायत्री पाटील, विजया कांबळे तसेच माजी जि प सदस्या सौ सुजाता पाटील , श्री अशोक पाटील तंटामुक्त कमिटी अध्यक्ष भागोजी पाटील, सप्ताह कमिटीचे सर्व सदस्य आणि बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.